पहिले पान | क्रीडाजगत | क्रिकेटपटूंच्या मालमत्तेचा तपास होणार

क्रिकेटपटूंच्या मालमत्तेचा तपास होणार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानी क्रिकेटला हादरवून सोडणा-या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता क्रिकेटपटूंच्या मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षातील क्रिकेटपटूंची कमाई आणि त्यांच्या मालमत्तेचा पाकिस्तानातील केंद्रीय महसूल विभाग तपास करणार आहे.

कराची- पाकिस्तानी क्रिकेटला हादरवून सोडणा-या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता क्रिकेटपटूंच्या मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षातील क्रिकेटपटूंची कमाई आणि त्यांच्या मालमत्तेचा पाकिस्तानातील केंद्रीय महसूल विभाग तपास करणार आहे.

क्रिकेटपटूंकडे असलेल्या गाडय़ा, जागा, शेतजमीन, बंगले, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बॅँकामधील खाती, लॉकर्स, पुरस्कर्ते तसेच हस्तांतरित मालमत्ता या सर्व बाबींची केंद्रीय महसूल विभागातर्फे चौकशी केली जाणार आहे. सलमान बट, मोहंमद आसिफ आणि मोहंमद आमिर हे स्पॉट फिक्सिंग प्रकरणात गुंतल्याचे आरोप होऊ लागल्यामुळे महसूल विभागाने हे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघातील सर्व क्रिकेटपटूंच्या मानधनाच्या स्रेताविषयीची संपूर्ण माहिती पुरवण्याचे आदेश प्रादेशिक प्राप्तिकर विभागाला देण्यात आले आहेत. क्रिकेटपटूंबरोबर प्रशिक्षक, व्यवस्थापक, समालोचक, निवड समिती सदस्य आणि अन्य अधिका-यांची पाच वर्षाची कमाई तसेच राष्ट्रीय कर क्रमांक अशी सर्व माहिती पुरवण्यास प्राप्तिकर विभागाला सांगण्यात आले आहे, असे महसूल विभागाचे लाहोरमधील सिनियर अधिकारी इस्रर रौफ यांनी सांगितले.

ब्लॅकमेल केल्याचा हमीदचा दावा

पाकिस्तान संघातील क्रिकेटपटूंनी गेल्या अडीच वर्षात जवळपास सर्वच सामने फिक्स्ड केले आहेत, असा गौप्यस्फोट करणारा माजी क्रिकेटपटू यासिर हमीदने सोमवारी घूमजाव केले. आपल्याला मुलाखत देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले होते, असा दावा त्याने केला आहे.

न्यूज ऑफ द वर्ल्ड दैनिकाला मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही, असे घूमजाव हमीदने केले आहे. दैनिकाच्या वार्ताहराने पुरस्कर्त्यांच्या नावाखाली माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझा मित्र 30 ऑगस्टला नॉटिंगहॅम इथल्या हॉलिडे इनमध्ये डिनरसाठी गेलो होतो. त्यावेळी अबीद खान नावाच्या व्यक्तीने आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. बॅटवरील स्टिकर आणि दुबईमधील जाहिरातीसाठी त्याने मला 50 हजार पौंडांची ऑफर दिली होती. उमर गुल, शाहीद आफ्रिदी, उमर अकमल आणि फावद आलम या चार क्रिकेटपटूंना अशाप्रकारच्या ऑफरमध्ये रस आहे, हेसुद्धा त्याने मला सांगितले होते, असे हमीदने सांगितले. खळबळजनक खुलासा करणा-या हमीदवर पाकिस्तानचा टी-20 आणि वनडे कर्णधार शाहीद आफ्रिदीने सडकून टीका केली. यासिर हमीदला आम्ही बऱ्याच वर्षापासून ओळखतो. तो 30 वर्षाचा असला तरी 15 ते 16 वर्षाच्या मुलाप्रमाणेच वागतो. त्याच्याकडून असेच वागणे अपेक्षित होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याने हे खुलासे केले असावेत, असे आफ्रिदीने सांगितले.

दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर पाकिस्तान संघातील क्रिकेटपटूंसह, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, व्यवस्थापक, अधिकारी अशा सर्वाच्या मालमत्तेचा तपास करण्याचे आदेश पाकिस्तानच्या केंद्रीय महसूल विभागाने दिले आहेत. क्रिकेटपटूंसह अधिका-यांनी 30 सप्टेंबरच्या आत आपल्या मालमत्तेची माहिती जाहीर करावी, असे महसूल विभागाने म्हटले आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान यांनी केला आहे. -याच वर्षापूर्वी मॅचफिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रिकेटपटूंवर पीसीबीने कठोर कारवाई केली असती तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती. 1993मध्ये पहिल्यांदा मॅचफिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा अनेक प्रकरणात सहभाग असायचा. स्पॉट फिक्सिंगचे आरोप खरे ठरल्यास, पाकिस्तान क्रिकेटचे बरेच नुकसान होईल. पाकिस्तान क्रिकेटसाठी हा खडतर काळ सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0