पहिले पान | क्रीडाजगत | लक्ष्मणच्या खेळण्याबाबत अनिश्चितता

लक्ष्मणच्या खेळण्याबाबत अनिश्चितता

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

कसोटी क्रिकेटमधील पहिल्या दोन स्थानांवरील भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये शनिवारपासून येथील नवीन व्हीसीए क्रिकेट कसोटी सामना मैदानावर सुरू होत असून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोणी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या तंदुरुस्ती अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.

नागपूर- कसोटी क्रिकेटमधील पहिल्या दोन स्थानांवरील भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये शनिवारपासून येथील नवीन व्हीसीए क्रिकेट मैदानावर सुरू होत असून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोणी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या तंदुरुस्ती अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. लक्ष्मणच्या खेळण्याविषयीचा निर्णय शनिवारी सकाळी घेतला जाणार असून तिस-या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हे त्यानंतरच ठरेल, असे धोणी म्हणाला.

"लक्ष्मणच्या खेळण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. आज त्याने सराव केला. त्याच्या तंदुरुस्तीबाबत निर्णय उद्या सकाळी होईल. संघातील अन्य क्रिकेटपटू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत," असे धोणी पत्रकार परिषदेत म्हणाला. स्वतः वरील क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार नाही हे मात्र त्याने स्पष्ट केले.

बांगलादेशमधील पहिल्या कसोटीदरम्यान लक्ष्मणच्या बोटाला दुखापत झाली असून त्याच्या खेळण्याबाबतची अनिश्चितता लक्षात घेऊन रोहित शर्माला अगोदरपासूनच बोलावण्यात आले आहे. लक्ष्मण नागपूर कसोटीत खेळला तरी तो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणार नाही हे नक्की, असेही धोणी म्हणाला.

राहुल द्रविड, युवराज सिंग हे मधल्या फळीतील खंदे फलंदाज आणि वेगवान गोलंदाज एस श्रीशांत दुखापतींमुळे नागपूर कसोटीला मुकणार आहेत. या सर्वांची अनुपस्थिती ही उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी संधी आहे, असे धोणी म्हणाला. 

व्हीसीएची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल असा अंदाज धोणीने व्यक्त केला. भारताचे सलामीचे फलंदाज वीरेंदर सेहवाग आणि गौतम गंभीर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना समर्थपणे तोंड देतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0