अडथळ्यांच्या शर्यतीत दोन सुवर्णपदके
अडथळ्यांच्या शर्यतीत दोन, तर बॉक्सिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाल्यामुळे आशियाडमध्ये भारताच्या खात्यात 10 सुवर्णपदके जमा झाली आहेत.
ग्वांगजो- जोसेफ अब्राहम आणि अश्विनी चिदानंद यांनी अडथळ्यांच्या शर्यतीत, तर बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णनने सुवर्णपदके पटकावल्यामुळे आशियाई क्रीडास्पर्धेत भारताच्या खात्यातील सुवर्णपदकांची संख्या 10 झाली आहे. अब्राहम आणि अश्विनी या दोघांनीही गुरुवारी पुरुष व महिला गटात चारशे मीटर विभागात सुवर्णपदक पटकावले. कृष्णनने 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले.
अश्विनीने 56.15 सेकंदात चारशे मीटर अंतर कापून वैयक्तिक विक्रम प्रस्थापित केला. जोसेफ मात्र त्याचा स्वतःचाच 49.51 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडण्यात थोडक्यात अपयशी ठरला.
अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारी अश्विनी तिसरी भारतीय महिला क्रीडापटू ठरली आहे. 1982 साली दिल्लीत झालेल्या आशियाडमध्ये एम डी वळसम्माने, तर 1986 साली सोल आशियाडमध्ये पी टी उषाने अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त केले होते.
याशिवाय भारताच्या मौसम खत्रीने कुस्तीमध्ये 96 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदकाची संधी हुकवून निराशा करणा-या भारतीय पुरुष हॉकी संघानेही दक्षिण कोरियाचा पराभव करून कांस्यपदक मिळवले.
भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनीही अंतिम फेरीत प्रवेश करून पदके निश्चित केली आहेत.
सध्या भारताच्या खात्यात नऊ सुवर्ण, 13 रौप्य आणि 29 कांस्य अशी एकूण 51 पदके जमा झाली आहेत. पदकतक्ता बघण्यासाठी क्लिक करा...http://www.prahaar.in/sports/asiangames/32724.html




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा