पहिले पान | क्रीडाजगत | आशियाई क्रीडास्पर्धा | भारतीय पुरुष संघाला हॉकीत कांस्यपदक

भारतीय पुरुष संघाला हॉकीत कांस्यपदक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

आशियाई क्रीडास्पर्धेत कांस्यपदक पटकावून भारताच्या पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक हुकल्याचे अपयश काही प्रमाणात धुऊन काढले.

ग्वांगजो- दक्षिण कोरियाच्या संघाला धूळ चारत कांस्यपदक पटकावून भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदक हुकल्याचे अपयश काही प्रमाणात धुऊन काढले. आशियाई क्रीडास्पर्धेत तब्बल चारवेळा अजिंक्यपद पटकावणा-या दक्षिण कोरियाच्या संघाला भारताने गुरुवारी 3-4 फरकाने हरवले.

सर्व साखळी सामने जिंकून सुवर्णपदक पटकावण्याची स्वप्ने बघणा-या भारतीय संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर गुरुवारी भारत आणि दक्षिण कोरियामध्ये कांस्यपदकासाठी लढत झाली.

गेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय संघ पाचव्या स्थानावर फेकला गेला होता. 2002 साली बुसान येथे झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळाले होते.

भारताच्या तुषार खांडेकरने 39व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. गोलकीपर भारत छेत्रीने अनेक गोल वाचवून भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली.   

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0