ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात
कर्णधार मायकेल क्लार्क आणि रिकी पॉंटिंगच्या नाबाद शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी तीन गडयांच्या बदल्यात 335 धावा केल्या.
ऍडलेड- कर्णधार मायकेल क्लार्क नाबाद 140 आणि रिकी पॉंटिंग नाबाद 137 यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली.
अॅडलेड येथे सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो क्लार्क-पॉटिंग या आजी-माजी कर्णधारांनी. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर चहापानपर्यंतच तीन विकेट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलिया बिकट स्थितीत होती.मात्र क्लार्क व पॉटिंग यांनी संघाला बिकट परिस्थितीतून सावरलेच शिवाय दिवसअखेर तीन बाद 335 अशी दमदार मजल गाठून दिली.
तत्पूर्वी, सलामीला आलेल्या इद कोवा आणि डेविड वॉर्नर यांना मोठी खेळी करता आली नाही. पर्थ कसोटीमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलेल्या डेव्हिड वॉर्नरला (8) झहीर खानने पायचित करुन टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर बाद झाल्यानंतर वन डाऊनला आलेल्या शॉन मार्शचा त्रिफळा उडवून आर अश्विनने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने अवघ्या तीन धावा केल्या. मग अश्विननेच सलामीवीर कोवानला व्हीव्हीएस लक्ष्मणकडे झेल देण्यास भाग पाडले. कोवान 30 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज वॉर्नर, मार्श आणि कोवन यांना सकाळच्या चहापानापर्यंत बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. आर. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रिकी पॉंटिंग आणि क्लार्क यांनी दमदार फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पॉटिंगने त्याची वैयक्तिक 81 वी धाव घेत कारकिर्दीतील 13 हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारा तो तिसरा फलंदाज ठरला. यानंतर या जोडीने जोरदार फटकेबाजी करत शतकाच्या दिशेने आगेकूच केले.पॉटिंगने कारकिर्दीतील 41 वे शतक झळकावळे तर त्यापाठोपाठ कर्णधार क्लार्कनेही आक्रमक शतक ठोकले. त्याचे हे 19 वे शतक आहे.
भारताकडून अश्विनने दोन आणि झहीर खानने एक गडी बाद केला.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा