भारतावर दुस-या व्हाईटवॉशचे सावट
विजयासाठी 500 धावांचा पाठलाग करताना चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 6 बाद 166 धावा अशी बिकट झाली आहे.
अॅडलेड- ऑस्ट्रेलियामध्येही भारताचा लाजिरवाणा व्हाईटवॉशन निश्चित झाला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विजयासाठी 500 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 6 बाद 166 धावा अशी बिकट झाली आहे.
गंभीर (3), सेहवाग (62), द्रविड (25), तेंडूलकर (13), लक्ष्मण (35) आणि दिवसाचे अखेरचे षटक शिल्लक असतानाच विराट कोहली (22 ) धावा करुन धावबाद झाला. षटकाच्या अखेरच्या चेंडुवर एक धाव घेऊन नाईटवॉचमन इशांत शर्माला वाचविण्याच्या प्रयत्नात कोहली धावबाद झाला. त्यामुळे भारताचा या सामन्यात पराभव जवळपास निश्चितच झाला आहे.
त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दुसरा डाव 5 बाद 167 वर घोषित केला. गुरुवारच्या 3 बाद 50 धावसंख्येवरुन खेळ सुरु केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला उमेश यादवने धक्का दिला. त्याने मायकल क्लार्कला बाद केले. क्लार्क 37 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर इशांत शर्माने मायकल हसीला बाद केले. रिकी पाँटिंगने दुस-या डावातही तूफान खेळी करत नाबाद (60) धावा झळकावल्या. सकाळी ऑस्ट्रेलियाने आपला डाव 167 धावांवर घोषित करुन भारतासमोर विजयासाठी 500 धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 6 बाद 166 धावा केल्या आहेत. गौतम गंभीर अवघ्या 3 धावा काढून तंबूत परतला. त्यांतर विरेंदर सेहवागने कांगारुंवर हल्ला चढवत आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या 36 चेंडुंमध्ये 11 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. मात्र सेहवाग (62) धावा करुन तंबूत परतला.
त्यानंतर आलेला सचिनही अवघ्या 13 धावा काढून बाद झाला. ऑफ स्पिनर नॅथन लियानच्या चेंडुवर फॉरवर्ड शॉर्टलेगवर कोवेनने त्याचा झेल घेतला. सचिनच्या महाशतकाचे स्वप्नही पुन्हा एकदा भंगले. तर हॅरीसच्या एका बाहेरच्या चेंडुवर ड्राईव्हचा फटका मारण्याच्या नादात द्रविडने गलीमध्ये हसीच्या हातात झेल दिला. त्याने 25 धावा केल्या. त्यानंतर व्ही. व्ही. एस लक्ष्मणने (35) धावा केल्या. ईशांत शर्मा (नाबाद 2) आणि वृद्धीमन सहा (नाबाद 0) धावांवर खेळत आहेत.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा