PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: लिएंडर पेसला मिश्र दुहेरीचे विजेतेपद लिएंडर पेसला मिश्र दुहेरीचे विजेतेपद ================================================================================ पीटीआय on 31 January, 2010 02:00:00 PM मेलबर्न- भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएंडर पेस याने त्याची झिंबाब्वेची सहकारी कारा ब्लॅकसह ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. येथे झालेल्या अंतिम सामन्यात पेस आणि ब्लॅक यांनी रशियाच्या इकातेरीना माकारोव्हा आणि झेकोस्लोव्हियाच्या जेरस्लोव्हा लिव्हॅनस्की यांचा ७-५, ६-३ असा पराभव केला आहे. पेसचे हे ११ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. या विजेतेपदासह त्याने महेश भूपतीच्या ११ ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी केली आहे. लिएंडर पेसची आत्तापर्यंतची ग्रँडस्लॅम विजेतेपदे- *फेंच ओपन- १९९९, २००१, २००९ (सर्व पुरुष दुहेरीत) * अमेरिकन ओपन- २००६, २००९ (पुरुष दुहेरीत), २००८ (मिश्र दुहेरी) * ऑस्ट्रलियन ओपन- २००३, २०१० (मिश्र दुहेरीत) * विंबल्डन- १९९९ (पुरुष आणि मिश्र दुहेरीत), २००३(मिश्र दुहेरीत)