ऑस्ट्रेलियन ओपन- व्हिक्टोरिया विजयी
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात झालेल्या अंतिम लढतीत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिने विजेतपद पटकावले.
मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिने विजेतपद पटकावले. रशियाच्या मारिया शारापोव्हाचा 6-3, 6-0 असा फडशा पाडून तिने आपल्या कारकीर्दीतलं पहिलंवहिलं ग्रँडस्लॅम पटकावत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिलांच्या अंतिम सामन्यात माजी विजेत्या मारिया शारापोव्हाचं पारडं जड वाटत होतं. पहिल्या सेटची सुरुवातही तशीच झाली. टॉस जिंकून सर्व्हिस घेणा-या अझारेन्कानं डबल फॉल्ट करत पहिला गेम घालवल्याने शारापोव्हानं 2-0 अशी आघाडी घेतली. पण, त्यानंतर अझारेन्कानं जो काही धडाका लावला त्यापुढे शारापोव्हाचा निभावच लागला नाही. अझारेंकाने शारापोवाचा 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव केला. सुमारे 82 मिनिटे चाललेल्या या सामन्यावर पूर्णपणे तिस-या मानांकित असलेल्या अझारेन्काचे वर्चस्व होते. स्पर्धेच्या सुरुवातीला अझारेन्का 0-2 अशी पिछाडीवर पडली होती. पण त्यानंतर तिने ही पिछाडी भरून काढत या किताबावर आपले नाव कोरले.
''आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच संस्मरणीय आहे. ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे मी आज खूप आनंदी आहे'', अशी प्रतिक्रिया व्हिक्टोरिया अझारेन्का हिने व्यक्त केली.
''खेळामध्ये सगळेच दिवस सारखे नसतात. एक तरी दिवस हा खास तुमचा असतोच. तसंच काहीसे आजच्या लढतीतमध्ये दिसून आले. व्हिक्टोरियाने केलेल्या सुंदर खेळीमुळे तिला विजय मिळाला''अशी प्रतिक्रिया शारापोव्हा हिने व्यक्त केली.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा