भूपती-बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत
भारताची नवी टेनीस जोडी महेश भूपती आणि रोहण बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला.
मेलबर्न- भारताची नवी टेनीस जोडी महेश भूपती आणि रोहण बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. तर भारताचा लिएंडर पेस व त्याचा झेक प्रजासत्ताकचा जोडीदार रॅडीक स्टेपनेक यांनीही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दुसरी फेरी गाठली.
भूपती- बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एडन व ख्रिस गुस्सिन या जोडीचा 5-7 6-4 6-4 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये ऑस्ट्रेलियन जोडीने वर्चस्व मिळवल्यानंतर पुढचे दोन्ही सेट भारतीयांनी जिंकले मात्र विजयासाठी भूपती- बोपण्णाला चांगलेच झुंजावे लागले.
दुस-या सामन्यात पेस- स्टेपनेक यांनी ऑस्ट्रेलियाच्याच ग्रेग जोन्स व जॉन पॅट्रीक या जोडीच 6-2,6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा