आयपीएलच्या चौथ्या मौसमात 74 सामनेच
आयपीएलच्या चौथ्या मौसमात 94 ऐवजी 74 सामनेच खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई- क्रिकेटच्या विश्वात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आयपीएलचा चौथा मौसम लवकरच सुरू होता. या चौथ्या मौसमात काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या आय़पीएलच्या कार्यकारीणीच्या बैठकीत घेण्यात आला. या मौसमात 94 ऐवजी केवळ 74 सामनेच खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयपीएलचे हंगामी अध्यक्ष चिरायू अमिन यांनी दिली.
क्रिक्रेट विश्वामध्ये अल्पावधीतच आयपीएल कमालीचे लोकप्रिय झाले आहे. आयपीएलच्या चौथ्या मौसमात या स्पर्धेच्या रचनेत काही महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. त्यासंदर्भात रविवारी आयपीएलच्या कार्यकारिणीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आयपीएलमध्ये खेळल्या जाणा-या सामन्यांच्या संख्येबाबत आणि एकूण रचनेबाबत काही महत्त्वापूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार प्राथमिक पातळींवर आयपीएलमध्ये सहभागी होणा-या संघांचे दोन ग्रुप पा़डण्यात येणार आहेत. यातील प्रत्येक संघाला किमान सात सामने खेळायला मिळणार असल्याची माहिती आयपीएलच्या कार्यकारिणीतील एका सदस्याने दिली.
आयपीएलच्या चौथ्या मौसमात सहारा वॉरीर्यस आणि कोची फ्रँचाईजी या संघांचा समावेश होणार आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा