पहिले पान | क्रीडाजगत | राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा | भारताची `राष्ट्रकुल'मधील सर्वोत्तम कामगिरी

भारताची `राष्ट्रकुल'मधील सर्वोत्तम कामगिरी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

नेमबाजी, अथलेटिक्समध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकांमुळे भारताने राष्ट्रकुल स्पर्धतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत मंगळवारी भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केल्यामुळे भारताने राष्ट्रकुल स्पर्धांतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. नेमबाजीतील सुवर्णपदकामुळे भारताच्या खात्यात 31 सुवर्णपदके जमा झाली. याआधी 2002 मध्ये मॅचेस्टर (इंग्लंड) येथे झालेल्या स्पर्धेत भारताने 30 सुवर्णपदके पटकावली होती. त्यानंतर अथलेटिक्समध्ये मिळालेल्या सांघिक सुवर्णपदकामुळे सुवर्णपदकांची एकूण संख्या 32 झाली आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघानेही शूट-ऑफमध्ये इग्लंडचा 5-4 पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॅडमिंटनमध्येही ज्वाला गुत्ता-अश्विनी पोनप्पा जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे त्यांचेही पदक निश्चित आहे.

भारतीय नेमबाज हिना सिंधू आणि अनु राज सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल पेअर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. नेमबाज समरेश जंग आणि चंद्रशेखर कुमार चौधरी यांनी 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. तेजस्विनी सावंतने 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक पटकावले.

स्पर्धेत भारताने एकूण 89 पदके जिंकली असून यामध्ये 32 सुवर्ण, 25 रौप्य आणि 32 कांस्यपदकांचा समावेश आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट

Common Wealth 2010

Common Wealth 2010
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0