पहिले पान | क्रीडाजगत | राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा | भारताच्या खात्यात तिसावे सुवर्णपदक

भारताच्या खात्यात तिसावे सुवर्णपदक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी नेमबाज आणि बॉक्सर्स अपयशी ठरत असताना कृष्णा पुनियाने अथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावले.

नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी नेमबाज आणि बॉक्सर्स अपयशी ठरत असताना कृष्णा पुनियाने अथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावून भारताला तिसावे सुवर्णपदक मिळवून दिले. यामुळे भारताने राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्याच सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर अथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावणारी कृष्णा मिल्खासिंग यांच्यानंतर पहिलीच भारतीय क्रीडापटू ठरली आहे.

भारताच्या तेजस्विनी सावंत आणि मीना कुमारी यांनी महिला 50 मीटर प्रोन पेअर प्रकारात कास्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे आघाडीचे बॉक्सर्सही सोमवारी उपांत्य फेरीत पराभूत झाले. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणा-या विजेंदरलाही पराभवाचा सामना करावा लागला.

स्पर्धेत भारताने एकूण 75 पदक जिंकली असून यामध्ये 30 सुवर्ण, 22 रौप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे.

पदकतक्यात भारत सध्या 30 सुवर्ण पदकांसह दुस-या क्रमांकावर आहे. इंग्लंड 26 सुवर्णपदकांसह तिस-या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 61 सुवर्णपदकांसह पहिल्या स्थानावर आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट

Common Wealth 2010

Common Wealth 2010
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0