ऑल इज वेल
अनेक नकारात्मक बाबींमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारताने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले आहे.
नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि ज्वाला गुत्ता-अश्विनी पोनप्पा यांनी बॅडमिंटनमध्ये पटकावलेल्या दोन सुवर्णपदकांच्या जोरावर भारताने गुरुवारी पदकतालिकेत इंग्लंडला मागे टाकले आणि ३८ सुवर्णपदकांसह दुसरे स्थान पटकावून खेळाच्या मैदानात राष्ट्रकुल स्पर्धेची बहारदार सांगता केली. पदकांची संख्या आणि पदकतालिकेतील स्थान या दोन्ही आघाडय़ांवर भारतासाठी ही सर्वोत्तम राष्ट्रकुल स्पर्धा ठरली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने पदकांचे शतक पार केले. बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीमुळे हॉकी अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून झालेला 0-8 असा दारुण पराभव ब-यापैकी सुसह्य ठरला.इंग्लंडने 37 सुवर्णपदके जिंकून बुधवारी भारताला मागे टाकले होते. भारताप्रमाणेच त्यांनाही गुरुवारी तीन सुवर्णपदके पटकावण्याची संधी होती. पण बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरी, मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरी या तिन्ही प्रकारांत त्यांना मलेशियाकडून पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उलट ज्वाला-अश्विनीने त्यांच्या सिंगापूरच्या अणि सायनाने तिच्या मलेशियन प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून भारताच्या झोळीत दोन सुवर्णपदकांची भर टाकली आणि ती 38 वर नेली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचा अपवाद वगळल्यास भारताने प्रत्येक दिवशी सुवर्णपदकांची भर टाकली. केवळ दोनदाच ते तिस-या स्थानावर घसरले होते. ऑस्ट्रेलियाने 74 सुवर्णपदके पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.- खेळ रंगला..
- ‘हॅट्स ऑफ इंडिया!’
- शेराला भावपूर्ण निरोप
- भारताचे 101 पदकविजेते
- सुवर्णपदक विजेते
- अभिनव बिंद्रा-गगन नारंग (नेमबाजी),
- राही सरनोबत-अनिसा सय्यद (नेमबाजी),
- अनिल कुमार (कुस्ती),
- संजय कुमार (कुस्ती),
- रवींदर सिंग (कुस्ती)
- गगन नारंग (नेमबाजी),
- अनिसा सय्यद (नेमबाजी),
- ओमकार सिंग (नेमबाजी),
- रेणूबाला चानू (वेटलिफ्टिंग),
- राजेंद्र कुमार (कुस्ती),
- रवी कुमार (वेटलिफ्टिंग),
- विजय कुमार-गुरप्रीत सिंग (नेमबाजी),
- गीता देवी (कुस्ती),
- ओमकार सिंग-गुरप्रीत सिंग (नेमबाजी),
- डोला बॅनर्जी-दीपिका कुमारी-बोंबाल्या देवी (तिरंदाजी),
- गगन नारंग-इम्रान हसन (नेमबाजी), ॉ
- विजय कुमार (नेमबाजी),
- अलका तोमर (कुस्ती),
- अनिता (कुस्ती),
- ओमकार सिंग (नेमबाजी),
- हरप्रीत सिंग-विजय कुमार (नेमबाजी),
- गगन नारंग (नेमबाजी),
- योगेश्वर दत्त (कुस्ती),
- नरसिंग यादव (कुस्ती),
- दीपिका कुमारी (नेमबाजी),
- हरप्रीत सिंग (नेमबाजी),
- राहुल बॅनर्जी (तिरंदाजी),
- सुशील कुमार (कुस्ती),
- सोमदेव देववर्मन (टेनिस),
- कृष्णा पुनिया (अॅथलेटिक्स),
- अनू राज सिंग-हीना सिद्धू (नेमबाजी),
- ए. सी. अश्विनी-मनजीत कौर-सिनी जोस-मनदीप कौर (अॅथलेटिक्स),
- मनोज कुमार (बॉक्सिंग),
- अचंता शरथ कमाल-शुभजीत साहा (टेबलटेनिस),
- सुरंजॉय सिंग (बॉक्सिंग),
- परमजीत समोता (बॉक्सिंग),
- ज्वाला गुत्ता-अश्विनी पोनप्पा (बॅडमिंटन),
- सायना नेहवाल (बॅडमिंटन).
- रौप्यपदक विजेते
- सोनिया चानू (वेटलिफ्टिंग),
- सुखेन देय (वेटलिफ्टिंग),
- दीपक शर्मा-ओमकार सिंग (नेमबाजी),
- लज्जाकुमारी गोस्वामी-तेजस्विनी सावंत (नेमबाजी),
- अशेर नोरिया-रंजन सोढी (नेमबाजी),
- अभिनव बिंद्रा (नेमबाजी),
- राही सरनोबत (नेमबाजी),
- मनोज कुमार (कुस्ती),
- तिरंदाजी संघ,
- रंजन सोढी (नेमबाजी),
- निर्मला देवी (कुस्ती),
- मिश्र बॅडमिंटन सांघिक,
- आशिष कुमार (जिमनॅस्टिक),
- पुरुष नेमबाजी ट्रॅप,
- टेबलटेनिस महिला संघ,
- बबिता कुमारी (कुस्ती),
- विजय कुमार (नेमबाजी),
- अनुज कुमार (कुस्ती),
- सानिया मिर्झा (टेनिस),
- विकास गौडा (अॅथलेटिक्स),
- प्रजूषा मल्लिआकल (अॅथलेटिक्स),
- जोगिंदर कुमार (कुस्ती),
- हरवंत कौर (अॅथलेटिक्स),
- समरेश जंग-चंद्रशेखर कुमार (नेमबाजी),
- तेजस्विनी सावंत (नेमबाजी),
- हीना सिद्धू (नेमबाजी),
- पुरुष हॉकी संघ.
- ब्रॉँझपदक विजेते
- संध्या राणी देवी (वेटलिफ्टिंग),
- श्रीनिवास राव (वेटलिफ्टिंग),
- सुनील कुमार (कुस्ती),
- धरमेंदर दलाल (कुस्ती),
- प्रशांत कर्मकर (जलतरण-अपंग),
- महिला तिरंदाजी संघ,
- सुमन कुंडू (कुस्ती),
- आशिष कुमार (जिमनॅस्टिक),
- सुधीर कुमार (वेटलिफ्टिंग),
- गुरप्रीत सिंग (नेमबाजी),
- पुरुष तिरंदाजी संघ,
- नेमबाजी महिला संघ,
- कविता राऊत (अॅथलेटिक्स),
- गुरप्रीत सिंग (नेमबाजी),
- हरमिंदर सिंग (अॅथलेटिक्स),
- आर. अभिषेक-ए. अमलराज (नेमबाजी),
- मोनिका देवी (वेटलिफ्टिंग),
- डोला बॅनर्जी (तिरंदाजी),
- मानवजीत सिंग संधू (नेमबाजी),
- जयंता तालुकदार (तिरंदाजी),
- अनिल कुमार (कुस्ती),
- मानवजीत सिंग संधू (नेमबाजी),
- तेजस्विनी सावंत-मीना कुमारी (नेमबाजी),
- अमनदीप सिंग (बॉक्सिंग),
- जय भगवान (बॉक्सिंग),
- दिलबाग सिंग (बॉक्सिंग),
- सीमा अंतिल (अॅथलेटिक्स),
- विजेंदर सिंग (बॉक्सिंग),
- महिला रिले टीम,
- पुरुष रिले टीम,
- काशिनाथ नाईक (अॅथलेटिक्स),
- रणजित महेश्वरी (अॅथलेटिक्स),
- समरेश जंग (नेमबाजी),
- सुमा शिरूर-कविता यादव (नेमबाजी),
- मौमा दास-पौलमी घटक (टेबलटेनिस),
- अचंता शरथ कमाल (टेबलटेनिस).
व्हिडिओ सौजन्य-दूरदर्शन
Marathi Online News
Common Wealth 2010
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):
Rohan
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा