डोपिंग चाचणीत राणी यादव दोषी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय अथलीट राणी यादव उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी सांगितले.
नवी दिल्ली- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय अथलीट राणी यादव उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी सांगितले.
डोपिंग चाचणीत दोषी आढळलेल्या राणी यादवने 'स्टेरॉईड नॅनड्रोलन' या औषधाचे सेवन केले होते. राणी यादवच्या नमुन्यात नॅन्ड्रोलोन या ऍनाबोलीक स्टेरॉईड सापडल्याची माहिती कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने बुधवारी दिली. वाडाने बंदी घातलेल्या उत्तेजकात याचा समावेश होतो, असेही सीजीएफच्या पत्रकात म्हटले आहे. राणीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून सुनावणीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.
अथलिट्सच्या मंगळवारपर्यंत एकूण 1300 चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी फक्त तीन अथलिट्स उत्तेजक सेवन चाचणीत अडकले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा