हॉकीत भारताचे पदक निश्चित
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत मंगळवारी भारताच्या पुरुष हॉकी अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केले आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत मंगळवारी भारताच्या पुरुष हॉकी संघाने इंग्लंडच्या संघावर मात करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. यामुळे पुरुष हॉकीमध्ये भारताला पदक मिळणार हे निश्चित झाले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना 3-3 बरोबरीत सुटल्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूट-ऑफ घेण्यात आले. त्यामध्ये भारताने इंग्लंडचा 5-4 असा पराभव केला.
या सामन्यात इंग्लंडने भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र भारतीय हॉकीपटूंनी जोरदार मुसंडी मारत 3-3 अशी बरोबरी साधली आणि नंतर पेनल्टी शूट-ऑफमध्ये इंग्लंडला धूळ चारली.
Marathi Online News
Common Wealth 2010
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा