पहिले पान | क्रीडाजगत | द. आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे भारतात आगमन

द. आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे भारतात आगमन

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

दोन कसोटी क्रिकेट सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

मुंबई- दोन कसोटी क्रिकेट सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे शनिवारी मध्यरात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ नागपूर येथे सहा ते दहा फेब्रुवारी दरम्यान पहिला कसोटी सामना खेळणार आहे, तर कोलकाता येथे १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. दोन्ही संघाचे एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील सामने जयपूर, कानपूर आणि अहमदाबाद येथे २१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.

त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ अध्यक्षीय संघबरोबर सराव सामना खेळणार आहे. अध्यक्षीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. हा सामना दोन फेब्रुवारीपासून होणार आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माजी प्रशिक्षक माइक आर्थर आणि निवड समिती यांच्या मतभेद झाल्यामुळे आर्थर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी जलदगती गोलंदाज कोरी व्हॉन झिल यांना हंगामी प्रशिक्षकपद नेमण्यात आले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0