PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: द. आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे भारतात आगमन द. आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे भारतात आगमन ================================================================================ पीटीआय on 31 January, 2010 11:50:00 AM मुंबई- दोन कसोटी क्रिकेट सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे शनिवारी मध्यरात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ नागपूर येथे सहा ते दहा फेब्रुवारी दरम्यान पहिला कसोटी सामना खेळणार आहे, तर कोलकाता येथे १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. दोन्ही संघाचे एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील सामने जयपूर, कानपूर आणि अहमदाबाद येथे २१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ अध्यक्षीय संघबरोबर सराव सामना खेळणार आहे. अध्यक्षीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. हा सामना दोन फेब्रुवारीपासून होणार आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माजी प्रशिक्षक माइक आर्थर आणि निवड समिती यांच्या मतभेद झाल्यामुळे आर्थर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी जलदगती गोलंदाज कोरी व्हॉन झिल यांना हंगामी प्रशिक्षकपद नेमण्यात आले आहे.