PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: डेव्हिस चषक- पेस,भूपती विजयी डेव्हिस चषक- पेस,भूपती विजयी ================================================================================ पीटीआय on 06 March, 2010 07:05:00 PM मॉस्को- येथे सुरु असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात भारतीय टेनिसपटू लिंअँडर पेस आणि महेश भूपती यांनी इगॉर कुणीत्स्य्न आणि तिमुराझ गबानशिवली यांचा पराभव केला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात पेस आणि भूपती यांनी रशियन जोडीचा 6-3, 6-2,6-2 असा पराभव केला. डेव्हिस चषक स्पर्धेतील पेस आणि भूपती यांचा हा सलग 23वा विजय आहे.