पहिले पान | क्रीडाजगत | डेव्हिस चषक- भारत जागतिक गटातून बाहेर

डेव्हिस चषक- भारत जागतिक गटातून बाहेर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील एकेरी परतीच्या सामन्यातीस परभावामुळे भारताचे जागतिक गटातील आव्हान संपुष्टात आले आहे.

मॉस्को- येथे सुरु असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात झालेल्या एकेरी परतीच्या सामन्यात रविवारी भारताचा सोमदेव देवबर्मन याचा मिखाइल यॉझनीश याने पराभव केला. सोमदेवच्या या पराभवामुळे भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील जागतिक गटातील आव्हान संपुष्टात आले आहे.

जागतिक गटात रविवारी झालेल्या सामन्यात रशियाच्या यॉझनीश याने सोमदेवचा 2-6,1-6,3-6 असा पराभव केला. यॉझनीश आणि सोमदेव हे प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळत होते. या विजयासह रशियाने 3-1 अशी आघाडी घेत उपात्य फेरीत प्रवेश निश्चत केला आहे.

डेव्हिस चषक स्पर्धेच्या जागतिक गटातील सलामीच्या एकेरी सामन्यात सोमदेव आणि रोहन बोपन्ना पराभव झाला होता. त्यानंतर लिअँडर पेस आणि महेश भूपती यांनी मिळवलेल्या विजययामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हन जिवंत राहीले होते. मात्र रविवारी झालेल्या एकेरी परतीच्या लढतीमध्ये झालेल्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्ठात आले आहे. 1998 नंतर भारत प्रथमच डेव्हिस चषक स्पर्धेच्या जागतिक गटात खेळत आहे.

  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0