पहिले पान | क्रीडाजगत | 2013 पर्यंत कसोटीतून निवृत्तीचे ढोणीचे संकेत

2013 पर्यंत कसोटीतून निवृत्तीचे ढोणीचे संकेत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 2015च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी तयारी करण्यासाठी पुढील वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.

पर्थ- ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये 2015  मध्ये होणा-या वर्ल्डकपमध्ये खेळायचे असल्यास 2013 पर्यंत कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याचे संकेत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने दिले आहेत.

‘‘2015 च्या वर्ल्डकपमध्ये जर मी खेळणार असेन तर क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्ती घेईन. मात्र 2013 पर्यंत तीनही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा आहे,’’ असे ढोणीने सांगितले. ‘‘माझा हा निर्णय फक्त वैयक्तिक नसून देशाचा विचार करून घेणार आहे. फॉर्म हा महत्वाचा भाग असून जर 2014 पर्यंत मी फिट नसेन तर वर्ल्डकप एका वर्षानेच दूर राहतो. या परिस्थितीत वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत अनुभवी यष्टिरक्षक असणे गरजेचे आहे. ते पाहता मला योग्य तो निर्णय वेळीच घ्यावा लागेल,’’ असे ढोणीने सांगितले.

त्याचबरोबर 2013 मध्‍ये मी किती फिट आहे हे पाहीन. त्‍यावेळेस जर माझ्या शरीराने साथ दिली नाही तर 2014 साली फिटनेसनुसार यष्टिरक्षक बदलायचा की नाही याचाही निर्णय घेणार असल्याने संघाला विश्‍वचषकापर्यंत नवा यष्टिरक्षक तयार करता येईल, असे त्याने  सांगितले.

ढोणीने आतापर्यंत 66 कसोटी सामने खेळला आहे. तर 36 सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे आणि त्यातील 17 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे 30 वर्षीय ढोणीच्या निवृत्तीच्या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. 

 

भारतीय संघात दुफळी नाही

 

‘‘भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुममधील वातावरणाचा मला अभिमान असून संघात कोणतेही वाद नाहीत. आतापर्यंत भारतीय संघात दुफळी झाल्याचे मी पाहिले नाही. संघातील प्रत्येक जण यशापयशात एकमेकांची साथ देतो,’’ असे ढोणीने ऑस्ट्रेलियन मीडियाच्या टीकेवर सांगितले.

 

मालिकेत यशस्वी पुनरागमन हवे आहे

 

‘‘मालिकेत यशस्वी पुनरागमन करायचे आहे. इंग्लंड दौ-यातून मोठा धडा घेतला असून येथेही खूप काही शिकलो आहोत. नियोजनाप्रमाणे खेळ केल्यास विजय दूर नाही,’’ असे ढोणीने स्पष्ट केले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0