कसोटी कर्णधारपद सोडण्यास तयार- ढोणी
ऑस्ट्रेलिया दौ-यातील लाजीरवाण्या पराभवानंतर प्रभावहीन नेतृत्वावर होणा-या टीकेमुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणी याने कसोटी कर्णधारपद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले.
सिडनी- ऑस्ट्रेलिया दौ-यातील लाजीरवाण्या पराभवानंतर प्रभावहीन नेतृत्वावर होणा-या टीकेमुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणी याने कसोटी कर्णधारपद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले. कसोटी संघाचे नेतृत्व आपल्यापेक्षा उत्तम करणारा कोणी खेळाडू असेल तर कर्णधारपद सोडण्यात आपल्याला आनंदच वाटेल, असे त्याने नमूद केले.
"कोणा एका खेळाडूसाठी कर्णधारपद चिकटून राहिलेले नाही. हे पद मला मिळाले आहे. ही एक अतिरिक्त जबाबदारी आहे. मी या पदावर असेपर्यंत नेहमीच उत्तम कामगिरी करेन, मात्र नेहमीच या पदावर रहावे असा त्याचा अर्थ नाही" असे ढोणी म्हणाला.
जर कोणी सर्वोत्तम कामगिरी करत असेल तर त्याला कर्णधारपद द्यायलाच हवे असेही तो म्हणाला.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा