पहिले पान | क्रीडाजगत | तिलकरत्ने दिलशानचा कर्णधारपदाचा राजीनामा

तिलकरत्ने दिलशानचा कर्णधारपदाचा राजीनामा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने सोमवारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

कोलंबो- श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने सोमवारी  कर्णधारपदाचा राजीनामा दिला. माहेला जयवर्धनेच्या नावाची कर्णधारपदासाठी चर्चा असून लवकरच तशी घोषणा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 3-2 असा पराभव झाल्यानंतर त्याने पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्याने आपला राजीनामा क्रिकेट बोर्डाकडे पाठवला आहे. त्याचा हा निर्णय अपेक्षितच होता असे मत बोर्डाच्या सदस्यांनी  व्यक्त करत तो देशासाठी खेळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या  अंतिम फेरीत भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधारपदावरून कुमार संगकाराने राजीनामा दिला होता. त्यावेळी कर्णधारपदाची धुरा तिलकरत्ने दिलशानकडे सोपावण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.  तडाखेबाज फलंदाज असलेल्या दिलशानला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही.

दिलशानच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा विजय मिळवण्यात यश आले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0