PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सानामाचा चानू उत्तेजक चाचणीत दोषी सानामाचा चानू उत्तेजक चाचणीत दोषी ================================================================================ पीटीआय on 08 September, 2010 06:30:00 PM नवी दिल्ली- भारताची सर्वात यशस्वी वेटलिफ्टर सानामाचा चानू ही राष्ट्रीय उत्तेजक सेवन विरोधी संघटनेकडून (नाडा) घेण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली आहे. चानू जर 'बी' सँपल चाचणीत दोषी आढळल्यास तीच्यावर आजीवन बंदी येऊ शकते. 'वाडा'ने बंदी घातलेले मेथीलहेक्सनेमाइन हे उत्तेजक घेतल्याचे आढळून आल्याचे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने सांगितले. चानू हिच्या शिवाय अन्य एक खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. या खेळाडूचा राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील संघात समावेश नसल्याचे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सचिव सहदेव यादव सांगितले. मात्र या खेळाडूचे नाव जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. सानामाचा चानू याआधीही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली होती. 2004मध्ये अथेन्स ऑलिंपिकमध्येही चानू दोषी आढळली होती.