पहिले पान | क्रीडाजगत | एडलेड कसोटीनंतर द्रविड निवृत्त?

एडलेड कसोटीनंतर द्रविड निवृत्त?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात भरवशाचा फलंदाज 'द वॉल' राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकरच निवृत्त होण्याची शक्यता आहे.

एडीलेड- भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात भरवशाचा फलंदाज 'द वॉल' राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकरच निवृत्त होण्याची शक्यता आहे. एडलेड येथे चाललेली कसोटी ही त्याची अखेरची कसोटी ठरू शकते.

जागतिक क्रिकेटमध्ये विशेष लौकिक मिळवलेल्या राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियातील सततच्या अपयशामुळे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार केला आहे. याबाबत त्याने संघातील इतर खेळाडूंशीही चर्चा केली आहे.  ऑस्ट्रेलिया दौ-यात तो सातत्‍याने अपयशी ठरला आहे. शैलीदार फलंदाजी आणि बचाव तंत्रामुळे द्रवीड 'द वॉल' म्हणून ओळखला जातो. परंतु,  गेल्‍या 10 कसोटींमध्‍ये तब्‍बल 9 वेळा त्‍याचा त्रिफळा उडाल्याने त्याच्यावर टीका होत आहे. 

भारत एडीलेड कसोटीत पराभव तसेच परदेशातील सलग दुस-या व्‍हाईटवॉशच्‍या उंबरठ्यावर आहे. हा सामना झाल्‍यानंतर द्रविड निवृत्तीबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

यापूर्वीच द्रविडने वनडे आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती  घेतली आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0