गेट वेल सून, युवी!
आपला लाडका क्रिकेटपटू लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी युवराज सिंगच्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई- गतवर्षी ज्याच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाने वानखेडे मैदानावर भारतीय संघाने विश्वविजेतेपद मिळवले. त्या युवारज सिंगला फुप्फुसाचा कर्करोग आल्याचे निदान झाल्यानंतर आपला लाडका क्रिकेटपटू लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्यांच्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराजवर अमेरिकेतील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूमध्ये उपचार सुरु आहेत. युवराज लवकर बरा व्हावा म्हणून क्रिकेटप्रेमींनी फेसबुक आणि माक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरवर मेसेज सुरु केले आहेत. युवराजच्या चाहत्यांबरोबरच आजी-माजी क्रिकेटपटूंनी युवराजसाठी 'गेट वेल सून'चे मेसेजेस पाठवले आहेत. युवराज फुप्फुसाच्या कर्गरोगावर मात करुन लवकरच बरा होईल. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा असा मेसेज माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टि्वटरवर केला आहे. युवराजच्या पाठिंशी सर्वांच्या शुभेच्छा आहेत असा मेसेज टेनिसपटू रोहन बोपण्णा याने केला आहे.
क्रीडाक्षेत्रातील राजकीय नेत्यांनी युवराज लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज लवकरात लवकर बरा व्हावा. त्याच्या क्रिकेटमुळे अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी म्हटले आहे.
युवराजला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर वाईट वाटले. माक्ष तो लवकरच बरा होईल. आणि भारतासाठी पुन्हा एकदा खेळेल असा मेसेज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
याबरोबरच बिग बी अमिताभ बच्चन, केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन, उद्योगपती विजय मल्या यांनीही युवीला 'गेट वेल सुन'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजय माकन यांनी युवराजला सरकारकडून मदत देणार असल्याचे सांगितले आहे.
युवराजला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याची बातमी रविवारी समजल्यानंतर युवराज संदर्भातील सर्च इंटरनेटवर वाढत गेला. रविवारच्या भारतातील 'गुगल ट्रेन्ड' नुसार युवराज सिंग हा सर्च नव्या क्रमांकावर होता. तर सोमवारी गुगल ट्रेन्डमध्ये युवराज सिंग हा सर्च तिस-या क्रमांकावर पोहचला होता.
गेल्यावर्षी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत युवराजने केलेल्या कामगिरीने भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते. याच स्पर्धेत एका सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी घेण्याची कामगिरी त्यांनी केली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता. युवराजने स्पर्धेत केलेल्या बहारदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा