हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी विद्या स्टोक्स
हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी विद्या स्टोक्स यांची निवड झाली आहे.
नवी दिल्ली- हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी विद्या स्टोक्स यांची निवड झाली आहे. स्टोक्स यांनी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार परगट सिंग यांचा पराभव केला.
हॉकी इंडियाच्या हंगामी अध्यक्ष विद्या स्टोक यांना 41 मते मिळाली, तर परगट सिंग यांना 21 मते मिळाली. संघटनेच्या सरचिटणीसपदी नरिंदर बात्रा यांची निवड झाली आहे. त्यांनी गुंजम हैदर यांचा परभव केला. कोषाध्यक्षपदी मुश्ताक अहमद यांनी निवड झाली आहे.
हॉकी इंडियाची निवडणूक विविध कारणांमुळे चारवेळा पुढे ढकलण्यात आली होती. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र हॉकी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरुद्ध हॉकी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 30 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीला हिरवा कंदील दाखवला होता.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा