हॉकी विश्वचषक- ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 12-0 फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 12-0 फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. विश्वचषक स्पर्धेतील आजवरचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी 1982च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडचा 12-3 फरकाने पराभव केला होता.
राजधानीतील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या ग्रुप 'बी'मधील साखळी सामन्यात गुरुवारी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून डोनियरने सर्वधिक पाच गोल केले. जिमी डायर, ग्लेन टर्नर यांनी प्रत्येकी दोन तर डेसमंड, फर्ग्युसन क्वॉनग्वा आणि मॅथ्यू बटोर्नी यांनी प्रत्येकी एक गोल केला.
ऑस्ट्रेलियाचा तीन सामन्यांतील हा दुसरा विजय आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा पराभव आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा