संघात दुफळीच्या वृत्ताचे द्रविडकडून खंडन
भारतीय संघात दुफळी माजल्याच्या ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्ताचे भारताचा सिनियर फलंदाज राहुल द्रविडने खंडन केले आहे.
पर्थ- भारतीय संघात दुफळी माजल्याच्या ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्ताचे भारताचा सिनियर फलंदाज राहुल द्रविडने खंडन केले आहे. अशा टीकेची पर्वा टीम करत नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले. ‘‘जेव्हा संघ अपयशी ठरतो तेव्हा संघाबद्दल सर्वच वाईट दिसते. संघात (सेहवाग वि. ढोणी) असे कोणतेही मतभेद नाहीत. संघाचे स्पिरीट मजबूत आहे,’’ असे द्रविडने स्पष्ट केले.
भारताचा संघ हा सर्वात झटकन मोडणारा संघ आहे, अशी टीका ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने केली होती. तसेच सरावाऐवजी गो-कार्टिग केल्याने भारताच्या क्रिकेटपटूंवर टीका झाली होती. त्याबाबत द्रविडला विचारले असता, ‘‘जेव्हा संघ परदेश दौ-यावर असतो तेव्हा भारतात कोण काय बोलत आहे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यासर्वाची आम्ही फारशी चिंता करत नाही. कसोटीचे पाच दिवस नेहमीच महत्वाचे असतात आणि आम्ही त्याचाच विचार करतो,’’ असे द्रविडने स्पष्ट केले.
इंग्लंड दौ-याप्रमाणे हा दौरा असू नये
इंग्लंड दौ-यात ज्याप्रकारे भारताला व्हाइटवॉश स्वीकारावा लागला तशी परिस्थिती ऑस्ट्रेलियात होऊ नये, अशी द्रविडची अपेक्षा आहे. ‘‘ऑस्ट्रेलिया दौरा इंग्लंड दौरा होऊ नये. आम्ही चांगले क्रिकेट खेळू याची खात्री आहे. संघातील प्रत्येक जण त्यांच्या चुकांवर भरपूर मेहनत घेत आहे,’’ असे द्रविडने म्हटले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा