सध्या तरी निवृत्तीचा विचार नाही...
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असे सांगत आपली आपली कारकिर्द शेवटच्या टप्प्यात असल्याचे राहुल द्रविडने सांगितले आहे.
ऍडलेड - कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असे सांगत आपली आपली कारकिर्द शेवटच्या टप्प्यात असल्याचे राहुल द्रविडने सांगितले आहे. राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या मालिकेत द्रविडची कामगिरीही अत्यंत सुमार होऊन त्याला अवघ्या 194 धावाच करता आल्या. इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही 4-0 अशा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर राहुल द्रविड निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.
मात्र याबाबत तो म्हणाला की, ''मी अद्याप निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही. सध्या तरी मला निवृत्तीचा निर्णय घ्यावा, असे वाटत नाही. मात्र माझी कारकिर्द शेवटच्या टप्प्यात असल्याचे मी मान्य करतो. पुढील सात महिने भारत कसोटी सामना खेळणार नसल्याने निवृत्तीचा निर्णयही तेव्हाच घेणे योग्य ठरेल.'' असे मत त्याने व्यक्त केले.
भारतीय संघातील युवा खेळाडूंबाबत तो म्हणाला की, ''या कसोटीनिमीत्ताने नवीन युवा खेळाडू समोर येत आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मजबूत बनवण्यासाठी होईल असा विश्वास आहे. भारत हा कसोटी क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहे. आम्ही विविध संघांविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखविलेली आहे. फक्त संघात काही सुधारणा करण्याची गरज असून त्याही लवकरच होतील'' अशी अपेक्षा राहुल द्रविडने व्यक्त केली आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा