पहिले पान | क्रीडाजगत | भारताचा दारुण पराभव, मालिका गमावली

भारताचा दारुण पराभव, मालिका गमावली

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मेलबर्न किंवा सिडनीप्रमाणे चौथ्या दिवसापर्यंतही तग न धरता, भारतीय संघाने पर्थ कसोटीत तिस-याच दिवशी नांगी टाकली.

पर्थ- मेलबर्न किंवा सिडनीप्रमाणे चौथ्या दिवसापर्यंतही तग न धरता, भारतीय संघाने पर्थ कसोटीत तिस-याच दिवशी नांगी टाकली. ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाजांसमोर भारताचा दुसरा डाव रविवारी उपाहारानंतर लगेच 171  धावांमध्येच उखडला गेला. एक डाव आणि 37 धावांनी ही कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. गेली तीन वर्षे भारताचा ताबा असलेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी अशा रीतीने ऑस्ट्रेलियाकडे गेली. दहा दिवसांनी अ‍ॅडलेड येथे चौथी कसोटी सुरू होत असून, तीही जिंकून ऑस्ट्रेलियाही भारताला इंग्लंडप्रमाणे 4-० असा व्हाइटवॉश देईल, अशीच चिन्हे आहेत.

परदेशी भूमीवरील हा भारताचा सलग सातवा पराभव. या सातही पराभवांमध्ये प्रत्येक सामन्यात चार दिवसांतच भारताचा निकाल लागला. इंग्लंडमधील एकच सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबला, पण त्याही सामन्यात एक पूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला होता! उमेश यादवचे पाच बळी आणि दुस-या डावात विराट कोहलीने झळकवलेले अर्धशतक हीच भारताच्या दृष्टीने जमेची बाजू. पहिल्या डावात 161  धावा केलेल्या भारतीय फलंदाजांना दुस-या डावातही दोनशे धावांच्या पलीकडे जाता आले नाही. सलग दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने भारताच्या सर्व फलंदाजांपेक्षा अधिक धावा करून दाखवल्या. सिडनीत ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने एकटय़ाने 329 धावा नाबाद केल्या, त्यावेळी भारताचा पहिला डाव 191  धावांतच संपला होता. या वेळी तर सामनावीर डेव्हिड वॉर्नरच्या 180  धावांच्या पलीकडे भारतीय फलंदाजांना दोन्ही वेळा जाता आले नाही! या सामन्यानंतर आणि मालिकेनंतर व्हीव्हीएस लक्ष्मणला निवृत्त होण्याविषयी सांगितले जाईल, असे वृत्त आहे. काही सीनियर क्रिकेटपटूंना वगळावे, अशाही सूचना येत आहेत. कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला फॉर्म सापडत नाहीच, शिवाय स्लो ओव्हर रेटमुळे ढोणीला अ‍ॅडलेड कसोटीला मुकावे लागले आहे. या मालिकेत भारताच्या एकाही फलंदाजाला शतक झळकवता आलेले नाही. अशा विस्कळीत, विस्कटलेल्या संघाला पुढील कसोटीच नव्हे, तर त्यानंतर होणारी तिरंगी वनडे मालिकाही फार जड जाईल, हे जवळपास स्पष्ट आहे.

भारतीय धावफलक

गंभीर- 14 , सेहवाग- 10, द्रविड- 47, तेंडुलकर- 8, लक्ष्मण- 0, कोहली- 75, धोनी- 2, विनयकुमार- 6, जहीर खान- 0, ईशान्त शर्मा- 0 आणि यादव-(नाबाद) 0.

भारत- पहिला डाव- 161 आणि दुसरा डाव- 171 सर्वबाद

ऑस्‍ट्रेलिया- पहिला डाव- 369

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0