भारताच्या क्रिकेटपटूंची रॅँकिंगमध्ये घसरण
क्रिकेट संघांच्या रॅँकिंगमध्ये भारताची ज्याप्रकारे तिस-या स्थानी घसरण झाली आहे तशीच भारताच्या क्रिकेटपटूंचीही क्रमवारीत घसरण झाली आहे.
दुबई- क्रिकेट संघांच्या रॅँकिंगमध्ये भारताची ज्याप्रकारे तिस-या स्थानी घसरण झाली आहे तशीच भारताच्या क्रिकेटपटूंचीही क्रमवारीत घसरण झाली आहे.
सचिन तेंडुलकर ‘टॉप-10’मधून बाहेर पडला असून त्याला 13 व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. गोलंदाजीत झहीर खान दहाव्या स्थानी घसरला आहे. राहुल द्रविडच्या क्रमवारीतही तीन अंकांची घसरण झाली असून त्याला 18 वे स्थान मिळाले आहे. दोन अंकांनी घसरण झालेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणला 23 व्या आणि वीरेंदर सेहवागला 24 व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. सलामीवीर गौतम गंभीरचीही 34 व्या स्थानी घसरण झाली आहे. मालिकेत भारताकडून एकमेव शतक झळकवणाऱ्या विराट कोहलीच्या क्रमवारीत 17 अंकांची वाढ झाली असून त्याला 50वे रॅँकिंग मिळाले आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या रॅँकिंगमध्ये वाढ झाली आहे. कर्णधार मायकेल क्लार्कने तिसरे स्थान पटकवले असून सिनियर रिकी पॉँटिंगने 14 वे रॅँकिंग पटकवले आहे. पॉँटिंगच्या क्रमवारीत आठ अंकांची वाढ झाली आहे.


Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा