गेलसमोर मुंबई इंडियन्स फेल
ख्रिस गेलच्या झंझावातासमोर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ सलग दुस-यांदा अंतिम फेरीत मजल मारण्यात फेल ठरला.
चेन्नई- आयपीएल-4मध्ये मुंबईला मात्र उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. ख्रिस गेलच्या झंझावातासमोर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ सलग दुस-यांदा अंतिम फेरीत मजल मारण्यात फेल ठरला. बंगळूरु रॉजय चॅलेंजर्सनी 43 धावांनी विजय मिळवून दुस-यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स यांच्यात अंतिम झुंज रंगेल.बंगळूरुच्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला निर्धारित षटकांत 8 बाद 142 धावा इतकीच मजल मारता आली. हे आव्हान पेलताना कर्णधार सचिन तेंडुलकर आणि फॉर्मात असलेल्या आयडेन ब्लिझार्डकडून मोठय़ा सलामीची अपेक्षा होती. मात्र चौथ्या षटकांत श्रीनाथ अरविंदने ब्लिझार्डला (10) मयांक अगरवालकरवी झेलबाद करत मुंबईला पहिला हादरा दिला. हाणामारीसाठी पाठवलेला हरभजनही (13) त्याच्याच गोलंदाजीवर माघारी परतला. सचिनने एक बाजू लावून धरत धावफलक हलता ठेवला. त्याने 24 चेंडूत सात चौकारांसह 40 धावांची खेळी केली. मात्र डावखुरा फिरकीपटू सय्यद मोहंमदच्या फिरकीवर सचिन चकला अन् डेविलियर्सने कोणतीही चूक न करता त्याला यष्टिचीत केले.
बंगळूरुचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीने ११व्या षटकांत रोहित शर्मा (13) आणि अंबाती रायडू (0) यांना बाद करत मुंबईला आणखी अडचणीत आणले. त्यापाठोपाठ किरॉन पोलार्ड (3) माघारी परतल्याने मुंबईचा पराभव निश्चित झाला. जेम्स फ्रॅँकलिन (16) आणि लसित मलिंगाही (7) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळूरुतर्फे व्हेटोरीने तीन तर सय्यद मोहंमद आणि अरविंदने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा