पहिले पान | क्रीडाजगत | पराभवासाठी आयपीएल जबाबदार नाही

पराभवासाठी आयपीएल जबाबदार नाही

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील हाराकिरी ही इंडियन प्रिमीयर लीगमुळे (आयपीएल) नाही तर भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) अयोग्य नियोजनामुळे होत असल्याचे मत माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मुंबई- भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील हाराकिरी ही इंडियन प्रिमीयर लीगमुळे (आयपीएल) नाही तर भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) अयोग्य नियोजनामुळे होत असल्याचे मत माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

भारतीय संघाची परदेशातील अपयशाची मालिका चालूच असल्याने संघाच्या या कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार मानन्यात येत आहे. मात्र माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे व बापू नाडकर्णी यांच्यासह आता माजी कर्णधार वेंगसरकर यांनीही संघाच्या सध्याच्या कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार धरलेले नाही.

" दौ-यापूर्वी अजून काही सामने खेळणे आवश्यक होते. खेळाडूंचा पुरेसा सरावही झालेला नाही. याशिवाय संघातील रोहित शर्मा, वृद्धिमन सहा हे राखीव खेळाडू शेवटच्या कसोटीत खेळण्याची शक्यता असली तरी ते महिन्याहून अधिक काळ एकही सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे सध्याच्या कामगिरीसाठी फक्त आयपीएललाच जबाबदार धरणे योग्य नाही" असे, वेंगसरकर म्हणाले.

युवा खेळाडू, प्रथम श्रेणी क्रिकेट याशिवाय अ संघाबाबतही योग्य नियोजनाची गरज असल्याचेही वेंगसरकर यांनी नमूद केले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0