पहिले पान | क्रीडाजगत | दक्षिण आफ्रिकी ओपनः बोपण्णा-कुरेशी अजिंक्य

दक्षिण आफ्रिकी ओपनः बोपण्णा-कुरेशी अजिंक्य

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने त्याचा पाकिस्तानी साथीदार ऐसाम कुरेशी याच्या साथीने त्यांचे दक्षिण आफ्रिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद प्राप्त केले.

जोहान्सबर्ग- भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने त्याचा पाकिस्तानी साथीदार ऐसाम कुरेशी याच्या साथीने त्यांचे दक्षिण आफ्रिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद प्राप्त केले. रविवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बोपण्णा-कुरेशी जोडीने कॅरल बेक आणि हॅरोल्ड लेव्ही यांचा 2-6, 6-3, 10-5 असा पराभव केला.

बिगरमानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीचे हे पहिलेच एटीपी वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. बोपण्णाने यापूर्वी अमेरिकेच्या एरिक बुटोराकच्या साथीने लॉस एंजेलिस खुल्या स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते.  

2007 साली मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत, तर 2008 मध्ये न्यूपोर्ट खुल्या टेनिस स्पर्धेत बोपण्णा-कुरेशी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गेल्या वर्षभरात या दोघांनी तीन एटीपी चॅलेंजर विजेतेपदे मिळवली. मात्र एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याची या जोडीची ही पहिलीच वेळ आहे.  .

" एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचे अजिंक्यपद मिळाल्याने आम्हाला दोघांना खूप आनंद झाला आहे. 2009 हे वर्ष आम्हा दोघांसाठी खूप चांगले होते. मात्र एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेचे अजिंक्यपद मिळाले नव्हते. ती कसर या वर्षाच्या सुरुवातीलाच भरून निघाली," असे बोपण्णा म्हणाला. दुहेरी विभागात लवकरच पहिल्या दहांत येण्याचा विश्वास कुरेशीने यावेळी व्यक्त केला.  

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0