पहिले पान | क्रीडाजगत | संशयित क्रिकेटपटूंचा सराव थांबवला

संशयित क्रिकेटपटूंचा सराव थांबवला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

स्पॉटफिक्सिंग प्रकरणातील संशयित पाकिस्तानी क्रिकेटपटूंना संघ व्यवस्थापनाने मंगळवारी सराव थांबवण्यास सांगितले.

लंडन/इस्लामाबाद- स्पॉटफिक्सिंग प्रकरणातील संशयित पाकिस्तानी क्रिकेटपटूंना संघ व्यवस्थापनाने मंगळवारी सराव थांबवण्यास सांगितले. कर्णधार सलमान बट्ट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ या तिघांना टॉण्टन येथे चाललेला सराव थांबवून लंडनला स्कॉटलंड यार्डपुढे हजर होण्याची सूचना व्यवस्थापनाने केली आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात लॉर्डस येथे झालेल्या कसोटीमध्ये नो बॉल टाकण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी पैसे घेतल्याचा आरोप आहे. स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी यापूर्वीही या तीन क्रिकेटपटूंची चौकशी केली असून आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे.

ब्रिटनमधील `न्यूज ऑफ दी वर्ल्ड' या टॅब्लॉइड नियतकालिकाने स्पॉटफिक्सिंगचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संबंधित बुकीला अटक झाली होती. संशयित क्रिकेटपटूंना सराव थांबवून लंडनला पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने दीर्घ बैठकीनंतर घेतला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0