लक्ष्मणची निवृत्ती तूर्तास नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू मालिकेत फॉर्ममध्ये नसलेला शैलीदार फलंदाज सातत्याने अपयशी होत असला तरी त्याचा निवृत्तीबाबत सध्यातरी विचार नसल्याचे टीममधील त्याच्या एका सहका-याने सांगितले.
पर्थ- ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू मालिकेत फॉर्ममध्ये नसलेला शैलीदार फलंदाज सातत्याने अपयशी होत असला तरी त्याचा निवृत्तीबाबत सध्यातरी विचार नसल्याचे त्याच्या टीममधील सहका-याने सांगितले.
इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही टीम इंडियाने सपाटून मार खाल्ल्याने संघातील सीनियर खेळाडूंवर टीका होत आहे. तसेच त्यांच्या निवृत्तीबाबतही चर्चा होत आहे.
"निवृत्त होण्यापूर्वी लक्ष्मण त्याची पूर्वकल्पना देईल" असे, त्याच्या एका संघसहका-यांने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे ढासळल्यानंतर सर्व फलंदाजांवर चोहोबाजूंनी टीका होत असून टीकाकारांनी लक्ष्मणला विशेष लक्ष केले आहे.
संघातील सातही फलंदाजांची कामगिरी चांगली झाली नसताना एखाद्याला दोष देणे चुकीचे असल्याचे सलामीवीर गौतम गंभीर याने म्हटले आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा