पहिले पान | क्रीडाजगत | फेडररला नमवून नादाल अंतिम फेरीत

फेडररला नमवून नादाल अंतिम फेरीत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत राफेल नादाल आणि रॉजर फेडरर या दोन दिग्गजांमध्ये झालेल्या सामन्यात नादालने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

मेलबर्न-  ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत राफेल नादाल आणि रॉजर फेडरर या दोन दिग्गजांमध्ये झालेल्या सामन्यात नादालने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नादाल आणि फे़डरर यांच्यातील मैदानातील नेहमीची झुंज या सामन्यातही पहायला मिळाली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात नादालने फेडररचा 6-7 (5/7), 6-2, 7-6 (7/5), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

16 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणा-या फेडररने पहिल्याच सेटमध्ये झोकात सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये त्याने बाजी मारली असली तरी त्यामध्येही टेनिसप्रेमींना अत्यंत कडवी झुंज पहायला मिळाली. अफलातून झालेल्या या सामन्यात दोन्ही दिग्गजांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

पहिला सेट गमावल्यानंतर नादालने बहारदार खेळ करत सामन्यात पुनरागमन केले आणि दुसरा सेट 6-2 अशा मोठ्या फरकाने जिंकला. त्यानंतर तिसरा सेटही अटीतटीचा झाला. या सेटमध्येही नादालनेच बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली.

2007 पासून विम्बल्डनच्या एकाही स्पर्धेत फेडरर नादालला पराभूत करु शकलेला नाही.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0