PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सराव सामन्यात अभिषेक नायरचे शतक सराव सामन्यात अभिषेक नायरचे शतक ================================================================================ पीटीआय on 02 February, 2010 08:50:00 PM नागपूर- दक्षिण आफ्रिका आणि अध्यक्षीय संघ यांच्यात येथे चाललेल्या सराव सामन्यामध्ये मंगळवारी मुंबईच्या अभिषेक नायरने शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीपुढे अध्यक्षीय संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर नायर ((100) आणि शिखर धवन (70) यांनी सातव्या गड्यासाठी 181 धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला. नायर आणि धवनच्या फलंदाजीच्या जोरावर अध्यक्षीय संघाने चार बाद 56 या धावसंख्येवरून 318 धावांची मजल मारली. मॉर्न मॉर्केल आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने बिनबाद 44 धावा केल्या होत्या.