पहिले पान | क्रीडाजगत | आता जबाबदारी फलंदाजांवर- कर्स्टन

आता जबाबदारी फलंदाजांवर- कर्स्टन

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे चाललेला क्रिकेट कसोटी सामना जिंकण्याची संधी भारतीय संघाला अद्याप आहे, असे मत भारताचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे चाललेला क्रिकेट कसोटी सामना जिंकण्याची संधी भारतीय संघाला अद्याप आहे, असे मत भारताचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे. कसोटीच्या दुस-या दिवसाखेर, रविवारी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 558 धावांवर डाव घोषित केल्यानंतर भारताने पहिल्या डावात बिनबाद 25 धावा केल्या आहेत. आता जबाबदारी भारतीय फलंदाजांवर असल्याचेही कर्स्टन म्हणाले.   

भारतीय संघाने उत्तम फलंदाजी केल्यास हा सामना जिंकू शकतो. संघातील दोन फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यास हे शक्य आहे, असे कर्स्टन म्हणाले. 

अर्थात खंदे फलंदाज दुखापतीमुळे या सामन्यात उतरलेले नसल्याने भारताचे काम अधिकच कठीण झाले आहे. भरवशाचा राहुल द्रविड, शैलीदार व्हीव्हीएस लक्ष्मण आणि धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग यांच्या अनुपस्थितीत भारताची मदार नवोदितांवर आहे.  

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0