PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: आता जबाबदारी फलंदाजांवर- कर्स्टन आता जबाबदारी फलंदाजांवर- कर्स्टन ================================================================================ पीटीआय on 07 February, 2010 07:00:00 PM नागपूर- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे चाललेला क्रिकेट कसोटी सामना जिंकण्याची संधी भारतीय संघाला अद्याप आहे, असे मत भारताचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे. कसोटीच्या दुस-या दिवसाखेर, रविवारी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 558 धावांवर डाव घोषित केल्यानंतर भारताने पहिल्या डावात बिनबाद 25 धावा केल्या आहेत. आता जबाबदारी भारतीय फलंदाजांवर असल्याचेही कर्स्टन म्हणाले. भारतीय संघाने उत्तम फलंदाजी केल्यास हा सामना जिंकू शकतो. संघातील दोन फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यास हे शक्य आहे, असे कर्स्टन म्हणाले. अर्थात खंदे फलंदाज दुखापतीमुळे या सामन्यात उतरलेले नसल्याने भारताचे काम अधिकच कठीण झाले आहे. भरवशाचा राहुल द्रविड, शैलीदार व्हीव्हीएस लक्ष्मण आणि धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग यांच्या अनुपस्थितीत भारताची मदार नवोदितांवर आहे.