PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: `हॉकी इंडिया'ची मान्यता रद्द `हॉकी इंडिया'ची मान्यता रद्द ================================================================================ पीटीआय on 05 August, 2010 11:15:00 PM नवी दिल्ली- हॉकी इंडियाची वादग्रस्त निवडणूक पार पडून काही तास उलटत नाहीत तोच, केंद्र सरकारने हॉकी इंडियाची मान्यताच रद्द केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉकी इंडियाची मान्यता रद्द झाल्याचे समजते. हॉकी इंडिया ही खासगी संस्था असल्याचे पदाधिका-यांनी दिल्ली उच्च न्यायालयापुढे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर, या संस्थेची मान्यता का रद्द करू नये, अशी नोटिस क्रीडाखात्याने हॉकी इंडियाला बजावली होती. या कारणे दाखवा नोटिशीला हॉकी इंडियाने दिलेले उत्तर समाधानकार नसल्याचे कारण देत सरकारने संस्थेची मान्यता रद्द केली आहे. हॉकी इंडियाची मान्यता रद्द केल्याचे पत्र क्रीडाखात्याने हॉकी इंडियाच्या अध्यक्षांना तसेच सरचिटणीसांना पाठवले आहे.