राष्ट्रीय हॉकी महासंघाला पुन्हा मान्यता
हॉकी या क्रीडाप्रकारावर नियंत्रण ठेवणारी देशातील एकमेव संस्था म्हणून राष्ट्रीय हॉकी महासंघाला पुन्हा मान्यता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली- हॉकी या क्रीडाप्रकारावर नियंत्रण ठेवणारी देशातील एकमेव संस्था म्हणून राष्ट्रीय हॉकी महासंघाला पुन्हा मान्यता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारनेच वादग्रस्त परिस्थितीत हॉकी महासंघाची मान्यता रद्द केली होती.
भारतीय हॉकी महासंघाला मान्यता देत असल्याचे क्रीडाखात्याने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला कळवले आहे. त्याचप्रमाणे हॉकी इंडियाची मान्यता रद्द केल्याच्या निर्णयाबद्दलही आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला कळवण्यात आले आहे.
भारतातील हॉकीवर नियंत्रण ठेवण्याचे तसेच क्रीडाप्रकाराच्या विकासासाठी काम करण्याचे सर्व हक्क राष्ट्रीय हॉकी महासंघाला आहेत, असे या पत्रात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघ निवडण्याचे हक्कही हॉकी इंडियाला नसून राष्ट्रीय हॉकी महासंघाला आहेत, असेही यात म्हटले आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा