पहिले पान | क्रीडाजगत | देशात दर्जेदार फिरकीपटूंची वानवा- लक्ष्मण

देशात दर्जेदार फिरकीपटूंची वानवा- लक्ष्मण

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

सध्या संघातून खेळणारे फिरकी गोलंदाज सोडले तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्जेदार फिरकी गोलंदाज दिसून येत नाही, असे मत शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली- भारताकडे सध्या दर्जेदार फिरकी गोलंदाजांची कमतरता असल्याचे मत शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे. सध्या संघातून खेळणारे फिरकी गोलंदाज सोडले तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्जेदार फिरकी गोलंदाज दिसून येत नाही, असे लक्ष्मण क्रिकइन्फोच्या व्हिडिओ शोदरम्यान म्हणाला.

सध्या खेळणारे फिरकी गोलंदाज निवृत्त झाल्यानंतर फिरकी गोलंदाजांचा अभाव ही भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता लक्ष्मण याने व्यक्त केली. देशांतर्गत क्रिकेट खेळणा-या फिरकी गोलंदाजांची कामगिरी निश्चितच समाधानकारक नाही, असे तो म्हणाला.  

फलंदाजीच्या बाबत मात्र उलट परिस्थिती असल्याचे लक्ष्मणने नमूद केले. सध्याची फळी निवृत्त झाली तरी काळजीचे कारण नाही. गुणवान फलंदाजांची नवीन फळी अगोदरपासून तयार आहे, असे त्याने नमूद केले. सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्याचप्रमाणे अंबाती रायडूमध्येही भारतीय फलंदाजीचा कणा बनण्याचे गुण आहेत, असे लक्ष्मण म्हणाला. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0