पहिले पान | क्रीडाजगत | शिवेंद्र सिंग तीन सामन्यांसाठी निलंबित

शिवेंद्र सिंग तीन सामन्यांसाठी निलंबित

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणा-या शिवेंद्र सिंगला तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणा-या शिवेंद्र सिंगला तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. रविवारच्या सामन्यात पाकिस्तानी हॉकीपटूला जाणूनबुजून हॉकीस्टिक मारल्याप्रकरणी शिवेंद्रवर बंदी घालण्यात आली आहे.

शिवेंद्रने पाकिस्तानी हॉकीपटूच्या डोळ्याला जाणीवपूर्वक हॉकीस्टिक मारल्याचे दिसून आल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे प्रवक्ते अर्जन मीजर यांनी सांगितले. निलंबनाच्या निर्णयाविरोधात अपिल करण्याचा अधिकार भारताला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवेंद्रच्या निलंबनाविरोधात भारताने अगोदरच अपिल केले असल्याचे हॉकी इंडियाच्या अधिका-यांनी सांगितले.  

भारताच्या आघाडीच्या फळीतील हॉकीपटू शिवेंद्र सध्या चांगलाच फॉर्मात असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पहिला गोल त्यानेच केला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4-1 असा विजय मिळवला होता. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0