पहिले पान | क्रीडाजगत | लिएंडर पेसची दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक

लिएंडर पेसची दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत तर पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पेसने धडक मारली.

मेलबर्न- भारताच्या लिएंडर पेससाठी गुरुवारचा दिवस अतिशय बहारदार ठरला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत तर पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पेसने धडक मारली.

पुरुष दुहेरीमध्ये बीगर मानांकित पेसने त्याचा झेक प्रजासत्ताकचा जोडीदार रॅडेक स्टेपनेकच्या साथीने दुस-या मानांकित मॅक्स मिर्नी व डॅनिएल नेस्टर यांचा 2-6 6-4 6-4  असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दोन तास चाललेल्या या सामन्यात पेस-स्टेपनेक यांनी बहारदार खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम फेरीत पेस-स्टेपनेक यांचा सामना अग्रमानांकित अमेरिकेच्या ब्रायन बंधूंशी होणार आहे.

मिश्र दुहेरीमध्ये पेसने त्याची रशियन जोडीदार एलेना वेस्निनाच्या साथीने भारताच्या रोहन बोपण्णा व त्याची अमेरिकन जोडीदार लिसा रेमंड यांचा पराभव केला. अवघ्या तासभरातच पेस-वेस्निनाने बोपण्णा-रेमंडचा 6-2 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0