माजिदकडून पैसे घेतल्याची क्रिकेटपटूंची कबुली?
सलमान बटच्या रूममध्ये मिळालेली रक्कम बुकी मझर माजिदकडून घेतल्याची कबुली पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंनी स्कॉटलंड यार्ड पोलिसांसमोर दिली आहे.
लंडन : सलमान बटच्या रूममध्ये मिळालेली रक्कम बुकी मझर माजिदकडून घेतल्याची कबुली पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंनी स्कॉटलंड यार्ड पोलिसांसमोर दिल्याचे पाकिस्तानचे कायदेशीर सल्लागार तफझ्झुव रिझवी यांनी ‘जियो टीव्ही’ला सांगितले. मात्र ही रक्कम विविध कंपन्यांजवळ केलेल्या स्पॉन्सरशिपबद्दलची होती. तसेच कुठलेही गैरकृत्य केलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.‘‘माजिद हा कंपन्यांसोबतच्या कराराविषयी एजंटचे काम करत होता. तो बुकी आहे, हे आम्हाला ठाउक नव्हते. हे पैसे घेण्यामागे आमचा कुठलाही वाईट उद्देश नव्हता, असे सलमान बट, मोहंमद आमिर आणि मोहंमद आसिफने सांगितल्याचे,’’ रिझवी यांनी म्हटले.
माजिदकडून स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्याचा इन्कार तिन्ही क्रिकेटपटूंनी यावेळी केला. आपण क्रिकेटपटूंचा बचाव करत नसून चौकशी प्रक्रियेतून पुढे आलेली माहिती सर्वासमोर उघड करत आहोत, असे रिझवी यांनी सांगितले. अँटी करप्शन युनिटने घातलेल्या धाडीत बटच्या रूममध्ये 50 हजार पौंड मिळाले होते. प्रत्येक कंपनीसोबतचा लिखित करार यावेळी तिन्ही क्रिकेटपटूंनी पोलिसांना दाखवला.
क्रिकेटपटू त्यांचा एजंट स्वत: निवडतात. त्यात बोर्डाचा काहीच हस्तक्षेप नसता. बहिणीच्या लग्नासाठी सलमान बटने माजिदकडून पैसे घेतले नव्हते, असेही रिझवी यांनी स्पष्ट केले.
- पाकिस्तानच्या तिन्ही क्रिकेटपटूंची केवळ चौकशी
- ‘आयसीसीवर कायदेशीर कारवाई करू’
- आयसीसीने केला बचाव
‘स्पॉटफिक्सिंग’च्या आरोपानंतर पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यामागे पाकिस्तानविरुद्ध कुठलेही षडयंत्र नाही, अशा शब्दांत आयसीसीने स्वत:चा बचाव केला. ‘‘तिन्ही क्रिकेटपटूंवर नियम-२ अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व साक्षी घेतल्या जातील आणि पुरावे तपासले जातील. त्यामुळे बंदीमागे कुठलेही षडयंत्र असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपात तथ्य नसल्याचे,’’ आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटनचे प्रमुख रॉनी फ्लॅनगन यांनी सांगितले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा