दुखापतीमुळे पॅटिन्सन उर्वरित कसोटींना मुकणार
डाव्या पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा युवा तेज गोलंदाज जेम्स पॅटिन्सन भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही.
सिडनी- डाव्या पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा युवा तेज गोलंदाज जेम्स पॅटिन्सन भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही.
भारताच्या दुस-या डावात क्षेत्ररक्षण करताना पॅटिन्सनच्या पायाला दुखापत झाली. दुसरी कसोटी संपल्यावर त्याच्या पायाचा एक्स रे काढण्यात आला. त्यात फ्रॅक्चर नसले तरी शीरांवर ताण आल्याचे दिसले आहे त्यामुळे पॅटिन्सन उर्वरित कसोटी मालिकेत खेळू शकणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून (सीए) स्पष्ट करण्यात आले. पहिल्या दोन विजयात मोलाचा वाटा उचलणा-या पॅटिन्सनच्या दुखापतीमुळे यजमानांचा तेज मारा बोथट झाला आहे. पर्थमध्ये होणा-या तिस-या कसोटीसाठी त्याच्या जागी 12 जणांच्या संघात रायन हॅरिस आणि मिचेल स्टार्क यांना निवडण्यात आले आहे. उर्वरित संघ कायम ठेवण्यात आला आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा