पहिले पान | क्रीडाजगत | आयपीएलवर एमसीएचा बहिष्कार

आयपीएलवर एमसीएचा बहिष्कार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई- इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या शुक्रवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर होणा-या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती असोसिएशनचे चिटणीस लालचंद राजपूत यांनी दिली.

आयपीएलच्या तिस-या सत्राला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आयपीएलमधील काही सामने मुंबईतील ब्रेबॉर्न तसेच नेरुळ येथील डी.वाय.पाटील मैदानावर होणार आहेत. मात्र या स्पर्धेची तिकीटे मुंबई क्रिकेट असोसिएशनला गुरुवार संध्याकाळपर्यंत मिळालेली नव्हती. त्यामुळे ललित मोदी यांच्या कारभारावर नाराज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर आणि संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्या असल्याचे राजपूत यांनी सांगितले. 

या प्रकाराबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितल्यावर त्यांनी ही नाराजी व्यक्त करत आपणही या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. पवार यांच्या या निर्णयामुळे  मुंबई असोसिएशनचे कुणीही पदाधिकारी शुक्रवारी होणा-या सोहळ्यासाठी आणि त्यानंतर होणा-या सामन्यांना उपस्थित राहणार नसल्याचे  राजपूत यांनी सांगितले. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0