मला संघातून वगळू नका- हॅरिसची विनवणी
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळू नका अशी विनवणी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रेन हॅरिस याने संघ व्यवस्थापणाला केली आहे.
एडलेड- भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळू नका अशी विनवणी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रेन हॅरिस याने संघ व्यवस्थापणाला केली आहे.
वेगवान गोलंदाजीला साथ देणा-या खेळपट्टीमुळे पर्थ येथे झालेल्या तिस-या कसोटीत फिरकीपटू नॅथन लिऑनच्या जागी हॅरिसला संधी दिली होती. मात्र, एडलेड येथील कसोटीत एक वेगवान गोलंदाज वगळून पुन्हा फिरकीपटू लिऑनची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज पीटर सीडल याने विश्रांती घेण्यास नकार दिल्याने संघव्यवस्थापणाला मिशेल स्टार्क व हॅरिस या दोघांपैकी एकाला संघाबाहेर बसवावे लागणार आहे. त्यामुळे हॅरिसने संघव्यवस्थापणाला अशी विनवणी केली आहे. दुखापतीमुळे हॅरिसने चार महिन्यानंतर संघात पदार्पण केले आहे.
"मालिकेत 4-0 असे निर्भेळ यश मिळवण्याची आमची योजना असून चौथ्या कसोटीत सीडल खेळू इच्छित आहे. त्यामुळे मी आणि स्टार्क यापैकी दोघांना बाहेर बसावे लागेल" असे हॅरिस म्हणाला.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा