महिला दुहेरीमध्ये सानिया उपांत्यफेरीत
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये भारताच्या सानिया मिर्झाने तिची रशियन जोडीदार एलिना वेसनिनाच्या साथीने उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे.
मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये भारताच्या सानिया मिर्झाने तिची रशियन जोडीदार एलिना वेसनिनाच्या साथीने उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात सहाव्या मानांकित सानिया-वेसनिनाने दुस-या मानांकित अमेरिकेच्या लिझल हबर आणि लिसा रेमंड यांचा 6-3 5-7 7-6 (6) असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सानियाने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आहे.
उपांत्यफेरीत सानिया-वेसनिनाचा सामना रशियाच्या स्वेटलाना कुझनेस्तोवा व वेरा झोनरेवा यांच्याशी होणार आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा